भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरामध्ये मोहक तिरंगी आरास



श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात तिरंगा रंगाच्या फुलाची आरास करण्यात आली आहे. झेंडू कामिनी व शेवंतीच्या फुला पासून तिरंगा रंग तयार करण्यात आला. पंढरपूर मंदिरामध्ये आज तिरंग्यामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तर विठ्ठल रूक्मिणीच्या अंगावर आज तिरंगी उपरणं देखील आहे.

दरम्यान महत्त्वाचे सण, एकादशी निमित्त आकर्षक फुलांनी पंढरपूरचं मंदिर अनेकदा सजलेले पाहिलं आहे. आजही मंदिरात भक्तिभावाच्या वातारणासोबतच देशभक्तीपर वातावरण पहायला मिळालं आहे. विठू मंदिराचा गाभारा देखील आज तिरंगी फुलांनी सजला आहे.
ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण संदीप पोकळे, विक्रम भुरुके,  राहुल पोकळे, संतोष पोकळे, भालेश्वर पोपळे यांनी केली आहे यासाठी सुमारे साडेसातशे किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments