अश्लील व्हिडीओ दाखवून पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग; मारहाण करून केला गर्भपात..


पुणे:

पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहितेला अश्लील व्हिडीओ दाखवून पतीने तिच्यावर अनैसर्गिक संभोग केला. तसेच विवाहिता गरोदर असताना पोटावर लाथा मारून तिचा गर्भपात केला. हा प्रकार ३१ मे २०१९ ते ३ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत हिंजवडी येथे घडला. पीडित विवाहितेच्या फिर्यादीनुसार पती, सासरे, दीर आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने विवाहितेला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक संभोग केला. विवाहितेचा शारीरिक छळ केला. विवाहिता गरोदर असताना तिच्या पोटावर लाथा मारून तिचा बळजबरीने गर्भपात केला. तसेच साखर पुड्याच्या वेळी आरोपींनी २५ हजार रुपये मागितले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments