धक्कादायक! विवाहित महिलेवर पोलिसाचा सहा वर्ष अत्याचार; पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी


रायगड:

पेणमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानेच विवाहीत महिलेला धमकावत तिच्यावर ६ वर्ष शारिरिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. सततच्या त्रासाला कंटाळून या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलीस असल्याचा गैरफायदा घेत आरोपी पोलीस कर्मचारी शाम जाधवने महिलेला धमकावत गैरफायदा घेतला. तुझ्या पतीला आणि मुलाला मारुन टाकेन अशी धमकी देत आरोपीने सहा वर्ष पीडित महिलेशी संबंध ठेवले.  आपल्या विरुद्ध पीडित तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये आले ही समजतात आरोपी पोलिसांनी गोंधळ घातला. ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस नाईक व महिला पोलीस उप निरीक्षक घाडगे यांना आरोपीने शिवीगाळ केली. यावेळी ड्युटीवर असलेले पोलीस नाईक गुजराथी व पोलीस शिपाई मढवी हे समजावण्यासाठी गेले असता त्यांना देखील शिवीगाळ करुन हाताबुक्क्याने मारहाण केली.

 याप्रकरणी देखील आरोपी शाम जाधव याच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भा.द.वि. कलम 353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिस अधिक तपास करीत आहेत. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments