वैरागकरांच्या प्रश्नासाठी निरंजन भूमकर मंत्रालयातमुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित  पवार, खासदार सुप्रिया सुळे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, युवक चे प्रदेशाध्यक्ष मेहेबुब शेख यांची बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते निरंजन  भुमकर यांनी या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

 अंगावरचा नगरपंचायतीच्या विजयाचा गुलाल निघण्याच्या आधीच वैराग भागातील अर्थकरणाच्या व असंख्य बेरोजगार असणाऱ्या तरुणांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आसणारा संतनाथ सहकारी साखर कारखान्याचा विषय व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आसणारा जो वीषय अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात आहे तो वैराग येथील ग्रामीण रुग्णालयाचा विषय, आणी वैराग कृषी उत्पन्न बाजार उपसमिती करुन द्यावी हा एक विषय या सर्व विषयांवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सर्वच प्रश्न तत्काळ मार्गी लावले जातील असे नेत्यांनी आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments