शिवसेनेने शब्द पाळला, भाजपचं टेन्शन वाढलं


  
जसजशी निवडणूक जवळ येईल तससशी गोव्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट येत आहेत. आधी उत्पल पर्रीकरांच्या बंडानं भाजपचं टेन्शन वाढवलं आणी आता शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्याने उत्पल पर्रीकरांना आणखी बळ मिळणार आहे. शिवसेने हा डाव भाजपला चेकमेट देण्यासाठी जरी टाकला असला तरी याचा फायदा उत्पल पर्रीकरांना होणार एवढं मात्र निश्चित.

दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांच्या प्रेम करणारा वर्गही पणजीत मोठा आहे आणि त्यांच्या मुलालच भाजपने पणजीतून तिकीट डावलल्याने त्याचाही परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सतत उत्पल पर्रीकरांच्या तिकीटावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत होते, उत्पल पर्रीकरांनी ठाम राहवं त्यांनी निर्णय बदलू नये, असे सल्लेही राऊत देताना दिसून आले.


तसेच उत्पल पर्रीकरांना आपचीही ऑफर होतीच, उत्पल पर्रीकर अपक्ष लढल्यास आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा देऊ असे संजय राऊतांनी जाहीर करून आधीच बॉम्ब टाकला होता.


संजय राऊतांनी आधी बोलल्याप्रमाणे शिवसेना पणजीतील उमेदवारी मागे घेत उत्पल पर्रीकरांना पाठिंबा देणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळू शकते. कालच अमित शाह यांनी गोव्यात दाखल होतं मोदींनी केलेल्या कामाचा पाढा वाचत इतर सर्व राजकीय पक्षांवर तोफा डागल्या होत्या, तर आज पर्रिकरांसाठी आमचा उमदेवार त्याचा अर्ज मागे घेईल. तसेच शिवसेना उत्पल पर्रिकरांचा प्रचार करेल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने पर्रिकर यांना पाठिंबा दिल्याने पणजीची लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्रिकर या मतदारसंघातून विजयी होतात की भाजप ही जागा राखण्यात यश मिळवते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. उत्पल पर्रिकरांनी अर्ज भरला आहे. त्यांचा अर्ज वैद्य ठरला आहे. त्यामुळे आमचा उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर उमेदवारी अर्ज मागे घेईल. आमचे कार्यकर्ते मुंबईतून येतील तेही पर्रिकर यांचा प्रचार करतील, असं राऊत म्हणाले.

यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उत्तर प्रदेशात आणि गोव्यात घरोघरी प्रचार करत आहेत. चांगली गोष्ट आहे. त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. चांगलं आहे. ही त्यांची पक्षाशी निष्ठा आहे. देशासमोर अनेक प्रश्न असताना ते घरोघरी जात आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.

Post a Comment

0 Comments