लातूर! खासगी क्लासेस शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळेलातूर शहरातील उद्योग भवन परिसरात असलेल्या एका नामांकित खासगी क्लाससेच्या शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहरातील शिवाजी चौक पोलीस ठाण्यात 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात 'लातूर पॅटर्न'चा बोलबाला आहे. राज्यासह देशाच्या विविध भागातून शिक्षणासाठी हजारो विद्यार्थी लातूरात येतात. त्यामुळे येथे क्लासेसचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. शहरातील उद्योग भवन परिसरात शालेय विद्यार्थ्यांचे 'मामाडगे सायन्स क्लासेस' आहे. या खाजगी क्लासेसचे संचालक किशोर मामडगे यांनी एका मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आरोपी किशोर मामडगे यांनी दि. 26 डिसेंबर, 2021 रोजी पीडित मुलीला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून "तू अभ्यास व्यवस्थित करत जा, तू मास्क का लावतेस, बिना मास्कची चांगली दिसतेस, दररोज माझ्या क्लासमध्ये मास्क काढून बसत जा, क्लास सुरू होण्याच्या पंधरा मिनिटे आगोदर व क्लास सुटल्यानंतर पंधरा मिनिटे येऊन मला भेटत जा, तु मला आवडतेस, मी तुला आवडत नाही का ?" असे म्हणून ऑफिसचा दरवाजा लावण्यास सांगितले. तसेच यापुर्वीही वाईट हेतूने शरीराला स्पर्श केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

शिवाजी नगर पोलीस ठाण्यात शिक्षक किशोर मामडगे यांच्या विरुध्द कलम 354 (A) (1)(4) भादंवि, पोक्सो-12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील आरोपी आजारी असल्याकारणाने दवाखान्यात दाखल असून अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments