'सर्वात आधी राज ठाकरेंनी वाईन शॉप सुरू करायला सांगितलं'


राज ठाकरे यांनी कोरोना काळात मद्यशॉप सुरू करा सूचना केली होती, असं वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. राज्याचा महसूल वाढवा यासाठी राज ठाकरेंनी ही सूचना केली होती, असंही ते म्हणाले आहेत. त्यावेळी संजय राऊत यांनी अग्रलेख लिहून राज साहेबांवर टीका केली, तो अग्रलेख ऑनलाईन का काढण्यात आला? 

असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारला आता वाईन किराणा मालाच्या दुकानात देण्याची सुबुद्धी का सुचली? कंपन्यांचे शेयर घेतले म्हणून सुबुद्धी सुचली का? असा सवाल देशपांडेंनी उपस्थित केला आहे. भाजप के पाप गिनवानेसे शिवसेने के पाप कम नही होते, असं म्हणत त्यांनी टोलाही लगावला आहे.

Post a Comment

0 Comments