वैराग/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील झरेगाव येथील महावितरणच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ८० हजाराची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. नरसिंग मुरलीधर एडके (वय ६०) रा. झरेगांव ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैराग पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी हे पंढरपूर वरून देवदर्शन आवरून गावाकडे येत असताना वैराग येतील बँक आँफ इंडियाचे एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी १३ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वा. चे सुमारास गेलो परंतू २ ते ३ वेळा प्रयत्न केला परंतू पैसे निघाले नाहीत. त्यावेळी एटीएममध्ये आणखी एक व्यक्ती अंदाजे ३५ वर्षे वयाची हजर होती. त्या व्यक्तीचे वर्णन मला काही निटसे आठवत नाही. त्याने मला सांगितले की, तुम्ही डोक्याला लावलेला दुपट्टा काढा व कँमे-याकडे बघा असे म्हटले असता मी कँमे-याकडे बघत मी डोक्याला लावलेला दुपट्टा काढला. त्यानंतर परत एटीएमचा पीन दाबून पैसे काढण्याचा प्रयत्न केला परंतू पैसे निघाले नाहीत. त्यानंतर मी माझे एटीएम काढून घेवून निघून घरी निघून गेलो.
१५ जानेवारी रोजी सायंकाळी ७.०० वा. चे सुमारास फिर्यादीच्या मोबाईलवर आलेला मेसेज पाहिला असता माझे अकाँऊंडमधून १०,०००|- रुपये काढल्याचे चार मेसेज पडलेले बघितले. त्यामुळे एटीएम आहे का ते बघितले असता फिर्यादी च्या नावाचे एटीएम नसून ते कैलास खताळ या नावाचे एटीएम खिशात होते. त्यामुळे लगेच माझा मुलगाला फोन करुन सदर प्रकार सांगितला. त्यानंतर मुलाने माझे एटीएम कार्ड बंद केले. त्यानंतर माझा मुलगा दुस-या दिवशी पुणे येथून येवून मी व माझा मुलगा असे मिळून सुभाषनगर शाखा बार्शी येथे स्टेट बँक आँफ इंडिया येथे जावून सविस्तर चौकशी केली असता त्यांनी आम्हाला सांगितले की, तुमचे ४०,०००/- रुपये दिनांक १३ जानेवारी सोमवार पेठ बार्शी येथील अँक्सीस बँकेच्या एटीएम मशीनमधून काढले आहेत व दिनांक १४ जानेवारी रोजी ४०,०००/- रु. दत्तनगर आतनी येथील अँक्सीस बँकेच्या एटीएममधून काढल्याची माहिती दिली.
त्यामुळे वैराग येथे बँक आँफ इंडियाचे एटीएममध्ये पैसे काढत असतांना माझे एटीएम बदलून मला दुस-या नावाचे एटीएम देवून माझ्या एटीएमचा वापर करुन माझ्या स्टेट बँक आँफ इंडिया या खाते क्रमांक 11492071376 मधून एकूण 80000/- रुपये काढून घेवून फसवणूक केली. तरी दिनांक 13/01/2022 रोजी दुपारी 04/30 वा. सुमारास वैराग येथील बार्शी रोडवर असलेले बँक आँफ इंडियाचे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी 2 ते 3 वेळी प्रयत्न केला परंतू पैसे निघाले नाहीत. त्यावेळी एटीएममध्ये आणखी एक व्यक्ती अंदाजे 35 वर्षे वयाची हजर होती. त्यावेळी त्याने मला माझे एटीएम कार्ड घेवून दुसरे एटीएम कार्ड देवून निघून गेला व त्यानंतर त्याने दिनांक 13/01/2022 रोजी 40000/- रु. बार्शी येथील सोमवार पेठ येथील अँक्सीस बँकेच्या एटीएममधून व दुसरे दिवशी दिनांक 14/01/2022 रोजी दत्तनगर आतनी येथून अँक्सीस बँकेच्या एटीएममधून 40000/- रुपये माझे खात्यातून काढून घेवून अज्ञात ईसमाने फसवणूक केली आहे. त्यानुसार वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments