राज्यात आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात राजकीय नेते एकमेकांवर जहरी शब्दात टीका टिपण्णी करत आहेत. त्यातच आता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली आहे.
बातमी कशी होईल यासाठी किरीट सोमय्यांचे प्रयत्न सुरू असतात. चित्रपट चालवण्यासाठी जशी आयटम गर्लची गरज लागते. मला वाटत की, राजकीय क्षेत्रामध्ये किरीट सोमय्या भाजपच्या आयटम गर्लसारखे राजकारण करत आहेत. बातमी कशी होईल? यासाठी आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे, अशी जहरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
0 Comments