मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्याचा हट्ट यशवंत जाधव यांनी धरला होता. पण, आजारपणामुळे वेळ मिळत नव्हता. आज बाळासाहेबांच्या जयंतीदिनी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेना प्रमुखांनी माझ्या आणि आदित्य सोबत रहा, असे शिवसैनिकांना सांगितले.
शिवसैनिक माझ्या आणि आदित्यच्या सोबत हे आमचे भाग्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मधल्या काळात शस्त्रक्रिया झाल्याने मला घराबाहेर पडता आले नाही. म्हणून मी गप्प बसलो असे समजू नका. मी शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आहे. माझ्याकडेही तलवार आहे. ती कशी गाजवायची हे मला माहीत आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना इशारा दिला.
0 Comments