सोलापूर/प्रतिनिधी:
सोलापूर मधील कॉरन्टाईन सेंटर मधून कैद्याने धूम ठोकली आहे. कामती पोलीस ठाणे कडील गुरनं. २६५/२०२५ भादविसंक ४२० मधील मोहोळ तालुका सबजेल येथील आरोपीत विजय कुंडलिक गायकवाड,(वय वर्षे २९),राहणार मु.पो.मंगळुर,नं. ०१, ता.माजलगाव,जि.बीड हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने उपचाराकरीता त्यास केटरिंग कॉलेज (कॉरन्टाईन सेंटर),कंबर तलावजवळ,विजापूर रोड,सोलापूर येथे दाखल केले असता आरोपी हा प्रातविधी करीता सकाळी साडेआठ वाजल्या पासून ते पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास बाहेर काढले असता नजर चुकवुन कोव्हीड सेंटरच्या शौचालयातील खिडकी मधुन आरोपीत हा कायदेशीर रखवालीतुन पळुन गेला आहे.म्हणून पोलीस शिपाई अविराज सुरेश राठोड, नेमणुक मोहोळ पोलीस स्टेशन,सोलापूर ग्रामीण यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार टंकसाळी हे करत आहे.
0 Comments