सोलापूर! माढा तालुक्यातील शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात केले विष प्राशन
सोलापूर/प्रतिनिधी:

माढा तालुक्यातील टेंभुर्णी इथल्या एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ही घटना सोमवारी दुपारी अडीच ते तीन च्या दरम्यान घडली.

सुरेश पाटील असे त्या रोगर नावाचे विषारी औषध पिलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकरी सुरेश पाटील हे सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भेटण्यास आले होते, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर येऊन त्याने विषारी औषध प्राशन केले. 

तसेच तो खाली आला मात्र प्रमुख प्रवेशद्वारासमोरच त्याला चक्कर आल्याने तो खाली कोसळला, हे चित्र पाहून जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई जिल्हाधिकाऱ्यांचे बॉडीगार्ड यांनी ॲम्बुलन्सला फोन लावला. मात्र अँबुलस वेळेवर न आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या गाडीत घालून त्या शेतकऱ्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नक्की त्याने विषारी औषध कशासाठी प्राशन केले याची अद्याप ही सविस्तर माहिती मिळू शकली नाही मात्र त्याच्या शेतावर कुणीतरी कब्जा केल्याने वैतागलेल्या या शेतकऱ्याने असे कृत्य केल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

Post a Comment

0 Comments