अमृता फडणविसांचा ‘यांच्यावर’ मानहानीचा दावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह ट्विटचा मामला आता महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला आहे. अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अमृता फडणवीस यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. विद्या चव्हाण यांनी त्यांचा उल्लेख ‘डान्सिंग डॉल’ असा केला होता. महाराष्ट्र भाजपचे सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. काल त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

त्यांच्यावर दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यानंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी मानहानीच्या दाव्याची प्रत जोडली आहे. आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादी नेता विद्याहीन चव्हाण! आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण! असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलंय.

यावेळी बोलताना अमृता फडणवीस यांनी म्हटलंय की, महाविकास आघाडीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण सांगतात की, तुम्ही रश्मी ठाकरेंना राबडी देवीची उपमा दिलीत हे बरं झालं. एका प्रकारे त्यांनी गजारिया यांची साथ दिली. मात्र, जर फडणवीसांच्या पत्नीची दिली असती तर डान्सिंग डॉल अशी त्यांची प्रतिमा झाली असती. निदान अशी वाईट प्रतिमा त्यांची नाहीये. थोडक्यात, रश्मी ठाकरेंची अशी वाईट नाहीये मात्र, वाईटच प्रतिमा आहे, असंच त्या म्हणाल्या. म्हणजे अजून एका महिलेविषयी त्या असं बोलल्या. तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने जे गुण उधळले, ते आम्ही पाहिलेत, असंही त्या भाजपला म्हणाल्या. माझे गुण लोकसेवेचेही होते, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं होतं.

Post a Comment

0 Comments