सोलापूर/प्रतिनिधी:
जोडभावी पेठ चाटला चौक सोलापुर येथे बेकायदेशीरपरणे कुटुंणखाना चालु असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीवरुन दि. २५/०१/२०२२ रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकण्याकरीता सापळा रचुन घर नं. १७१/१७२, जोडभावी पेठ चाटला चौक सोलापुर या ठिकाणी बोगस गि-हाईक पाठवुन बातमीचे खात्री करुन १५.१५ वा. छापा टाकुन कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हयातील महिला आरोपी नामे क्र. १) सुनंदा शिवानंद जेंबगी (स्वामी) वय ३७ वर्ष, रा. घर नं. १७१/१७२, जोडभावी पेठ चाटला चौक सोलापुर (घरमालकीन) २) दत्ता हरिभाऊ भोसले वय ४७ वर्ष, रा. मड्डी वस्ती, जोशी गल्ली, सोलापुर यांनी संगनमत करुन एक पिडीत महिलेस आपल्या राहत्या घरात अटकावुन ठेवून त्यांची शारीरिक पिवळणुक करुन तिला पैशाचे अमिश दाखवुन वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडुन त्यांच्याकडुन वेश्या व्यवसाय करुवुन घेऊन त्यांच्या कमाईवर स्वतःची उपजिवीका करीत असताना मिळुन आल्याने त्याचेविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापुर शहर गु.र.नं. ४४ / २०२२ अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३,४,५ व ६ भा.द.वि.सं.कलम ३७० (अ) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करुन एक पिडीत महिलेची सुटका करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडील पोनि विजयालक्ष्मी करी हे करत आहेत.
सदरची पोलीस आयुक्त हरीष बैजल, पोलीस उप आयुक्त डॉ. वैशाली कडुकर,सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड,वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/ विजयालक्ष्मी कुरी, पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे, - सफी/गायकवाड, पोना/ जमादार, पोना/आरेनवरु,मपोना / म्हमाणे, मपोशि/ पतंगे, पोशि/ शेळके, पोशि/ जाधव, पोकॉ/धर्माधिकारी, पोशि/ चव्हाण यांनी बजावली आहे.
0 Comments