सोलापूर/प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलिस ठाण्यात आपहरन झालेला आठ वर्षाचा मुलगा पृथ्वीराज सुरेश बिराजदार रा. धोत्री ता. दक्षिण सोलापूर हा त्यांची मावशी सरुबाई माकप्पा आर्किले रा. धोत्री ता. दक्षिण सोलापूर यांच्याकडे गेल्या एक वर्षापासून राहण्यास होता. त्याची आई गौरी सुरेश बिराजदार हे तिच्या माहेरी मडयाल ता. जत जि. सांगली येथे भावा सोबत राहत होते. सदर अपहरण झालेल्या मुलाचे वडील हे मूळचे मुधोळ जि. बेळगाव (कर्नाटक) येथे सोन्याचा व्यवसाय करीत होते. ते मागील वर्षी कोरोना संसर्गाने मयत झाल्याने मुलाची आई गौरी बिराजदार ही सासरच्या सोन्याचा व्यवसाय माहेरी स्थानांतरित करून स्थायिक झाले होत्या.त्याचा मुलगा पृथ्वीराज याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याला मावशी सरुबाई यांच्याकडे शिक्षणाकरता पाठवण्यात आले होते. ३० डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता शाळेत जाण्याकरता पृथ्वीराज घरातून निघाला परंतु दुपारी शाळा सुटली नेहमी येण्याची वेळ झाली तरी घरी परतला नाही. बस ड्रायव्हरला विचारले असता तो सकाळी बसमध्ये आला नाही असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आजूबाजूला चौकशी केली असता तो हरवला असल्याची खात्री झाल्यानंतर वळसंग पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली, त्यानुसार वळसंग पोलिस ठाण्यांमध्ये भादवि कलम 567 व 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत साहेब पोलीस निरीक्षक अतुल भोसले (प्रभारी, अधिकारी, वळसंग) यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या मदतीने मुलाचे फोटो वर्णन माहिती सोलापूर, नगर, पुणे, मुंबई, सातारा या ठिकाणी प्रसारित केला. सदर घटनेबाबत आजूबाजूचे परिसरातून व मुलाचे कुटुंबीय नातेवाईक खडे शोध घेतला, सदर मुलाचे नातेवाईक तसेच मुलाच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तीकडून चौकशी केली. त्यानंतर कष्टाच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर वळसंग सांगली कर्नाटक अशा ठिकाणी तपास कामी पाच पथके पाठवली वेगवेगळ्या ठिकाणावर मिळालेल्या गोपनिय व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित इसमाची माहिती प्राप्त झाली. त्यातील एक संशयित इसम कुडाळ जिल्हा सांगली या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आला. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर सोबत मुलगा असल्याबाबत तपासात निष्पन्न झाले. उपलब्ध माहितीचा माहितीचा वापर करून अत्यंत चतुराईने तर तीन आरोपीला किर्लोस्कर कंपनी पलूस सांगली आणून आणण्यास भाग पाडले. पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपी अपहरणाकर्ता मुलगा ताब्यात घेतला. अधिक तपास केला असता ह्या गटाचा मास्टरमाईंड वेगळच असलेले असल्याचे पोलिसांना समजले, त्याला हुन्नुर कर्नाटक येथून ताब्यात घेतले व पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक आजय हाचाटे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश निंबाळकर सायबर सेल, सहाय्यक फौजदार माळाप्पा सुरवसे सहाय्यक फौजदार वाळुंजकर, हेडकॉन्स्टेबल दसरी नाई, माने, भोसले, गायकवाड, मोरे, पाटील, रेड्डी, खंडू माळी, रतन जाधव, मांढरे प्रमोद, गायकवाड, निलेश वरम, बनकर यांनी ही कामगिरी पार पाडली.
0 Comments