बार्शी शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी ॲड. जीवनदत्त आरगडे


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी ॲड. जीवनदत्त आरगडे यांची फेरनिवड तर तालुका अध्यक्ष पदी तानाजी जगदाळे यांची निवड करण्यात आली. सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. मागील काही वर्षापासून काँग्रेसच्या माध्यमातून स्वयंचलित घंटानाद आंदोलन, बुड बुड घागरी आंदोलन, तसेच विविध धरणे उपोषणे आंदोलने व विविध समाजोपयोगी कार्यक्रम उपक्रम अशा माध्यमातून अरगडे यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा पोहोचण्याचे काम केले आहे. 

विविध विषयांवर आरगडे हे विविध माध्यमातून परखडपणे मते मांडतात त्यामुळे बार्शी तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये आरगडे यांच्या नावाचे एक वेगळे वलय आणि आकर्षण आहे. सदर निवडी बाबत अरगडे यांनी पक्षातील सर्व नेते यांचे आभार मानले तसेच विविध स्तरातून आरगडे व जगदाळे यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments