बार्शी! खामगावमध्ये लहान मुलांच्या भांडणावरून एकास काटीने बेदम मारहाण



बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील खामगाव मध्ये लहान मुलांच्या भांडणावरून एकादा बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. शशिकांत सुखदेव कंगले (वय ३६) रा खामगांव ता बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघा जणांविरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिना दिवशी दुपारी४.००वा. सुमारास फिर्यादी घरासमोर बसलो असताना गावातील युवराज गुणवंत कांबळे ,पाडुरंग गुणवंत कांबळे दोघे रा. खामगांव ता. बार्शी जि. सोलापूर यांनी लहाण मुलाचे भांडणाचे कारणावरून मुलाला दम देतोस काय असे म्हणुन शिवीगाळी केली.  आम्हाला जेलमध्ये जायची सवय आहे. नाद करू नको तुला कुठे गायब करेन कळणार पण नाही. अशी धमकी देवुन त्याचे हातातील काठीने माझे पाठीवर, हातावर, पायावर, तोंडावर मारहाण करून जखमी केले. त्यानुसार भारतीय दंड संहिता कलम ३२४, ३४, ५०४ व ५०६ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments