पंढरपूर/प्रतिनिधी:
पंढरपूर शहरातील सावकारकीच्या कंटाळून २४ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पंढरपूर शहरातील अनिल नगर येथे राहणाऱ्या संतोष साळुंके या युवकाने साडीच्या साह्याने राहत्या घरी गळफास घेतला. संतोष साळुंके यांनी सुसाईड नोटमध्ये सदर सावकारांचे नाव लिहिले होते. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांकडून एक जणांला अटक करण्यात आली आहे.
नागपूर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल नगर येथे राहणाऱ्या संतोष साळुंके यांनी सावकार शेखर दत्तात्रेय कुंदुरकर त्याच्याकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते मात्र व्याजासकट पैसे परत करूनही शेखर कुंदूरकर हा संतोष साळुंके याला अजून पैशाची मागणी करत होता. यातूनच संतोष साळुंके याचे राहणारे घरही नोटरी पद्धतीने लिहून घेतले होते. यातूनच संतोष साळुंके यांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला अशाप्रकारची फिर्याद भाऊ पांडुरंग प्रकाश साळुंके यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
पंढरपूर शहरात गेल्या अनेक दिवसापासून सावकारकी प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. यामुळे सर्वसामान्य युवक सावकारी पाशात अडकत आहे., याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांनी शेखर कुंदूरकर याला अटक केली आहे. सुवर्णा अंकुश बिडकर व आकाश बिडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली आहे.
0 Comments