बार्शी! सार्वजनिक ठिकाणी गोंधळ; दोघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे वैराग नगरपंचायत निवडणुकीसाठी १८ जानेवारी  रोजी दुपारी साडे तीनच्या दरम्यान बार्शी कडून वैराग कडे चालले होते, शहरातील चोप्रा हॉटेल येथे सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग होईल अशी दोन इसम हातापायी करत होते त्यानुसार त्या दोघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी ते कुर्डुवाडी रोडवरील चोप्रा हॉटेल समोर यातील आरोपी नामे 1) राहुल रामलिंग खारवणे रा कासारवाडी रोड बार्शी ता बार्शी 2) सुरज दगडु भालशंकर रा  बगले बरड, सोलापुर रोड बार्शी ता बार्शी हे एकमेकांसोबत हातापायी करुन भांडण करुन झुंज खेऴुन  सार्वजनिक शांतता बिघडवीत असताना मिऴुन आले. त्यामुळे त्यांच्यावर शहर पोलिसात   भा.द.वि कलम 160 अन्वये कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments