वैराग नगरपंचायत निवडणूक मतदान १८ जानेवारीला सुट्टी वैराग या नगरपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूका 18 जानेवारी 2022 रोजी होणार आहेत.  या नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर पगारी सुट्टी अथवा दोन तास सवलत खाजगी कंपन्यामधील आस्थापना, शासकीय कार्यालये यांनी द्यावी, असे नगरपरिषद प्रशासनाचे सहआयुक्त आशिष लोकरे यांनी कळविले आहे.

निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी भर पगारी सुट्टी  देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स यांना लागू राहील.अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर त्यांनी जिल्हाधिकारी  तथा  जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेवून कमीत कमी दोन तास सवलत देणे आवश्यक आहे. संबंधित सर्व आस्थापना मालकांनी मतदारांना सवलत मिळेल याची दक्षता घ्यावी, असे श्री. लोकरे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments