सोलापूर! परराज्यातील वाहनाना विनाकारण अडविल्या प्रकरणी तडकाफडकी बदली


सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर शहर वाहतूक शाखेतील सहाय्याक पोलीस निरीक्षकासह पोलीस शिपाई यांची बदली पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांनी केली आहे.परराज्यातील वाहनाना विनाकारण अडविल्या प्रकरणी पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक शहर वाहतूक शाखा (दक्षिण) नितिन शिवाजी पवार यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

तसेच शहर वाहतूक शाखा (दक्षिण) पोलिस शिपाई शशिकांत गोविंद देडे यांची बदली सदर बझार पोलिस ठाणे येथे करण्यात आली आहे.विनाकारण परराज्यातील वाहनांना अडविल्या प्रकरणी उचलबांगडी करण्यात आले असून सोलापूर शहर वाहतूक शाखेत एकच खडबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments