बार्शी! 'इंडिया मेडिकल प्रोजेक्ट'च्या वतीने रक्तदान शिबिर



बार्शी/प्रतिनिधी:

सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात महिन्याच्या आरोग्यासंबंधी समस्येवर काम करणारे इंडिया मेडिकल प्रोजेक्ट अग्रणी संस्था मानली जाते. श्री माऊली बहुउद्देशीय संस्था संचलित 'इंडिया मेडिकल प्रोजेक्ट' ही संस्था महिला संबंधित प्रश्नावर अविरतपणे काम करत आहे.

ही संस्था महिलांचे आरोग्य, मानसिक समस्या व इतर अडीअडचणी सोडविण्याचे काम करते. 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराला महिला वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे रक्तदानासाठी महिला मोठ्या संख्येने समोर येत आहेत ही समाज परिवर्तनाची नांदीच म्हटलं पाहिजे.

या रक्तदान शिबिराचे आयोजन संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर बाबासाहेब यांनी केले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कल्पना पवार, सचिव रोहिणी चोबे, बार्शी तालुका अध्यक्ष प्रशांत पवार, बार्शी महिला अध्यक्ष प्रज्ञा नागरसुर, रेखा विधाते पल्लवी पाटील, मनीषा विधाते यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर संपन्न झाले.

Post a Comment

0 Comments