देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रशासनावर घट्ट पकड असलेला राजकारणी असं म्हटलं जातं. प्रशासन आणि सरकार ही लोकशाहीच्या हितासाठी काम करणारे महत्त्वाचे घटक आहेत. यांच्यात समन्वय असणं हे सर्वांच्या गरजेचं असतं. अशात आता मोदी सरकारच्या एका केंद्रीय मंत्र्याचा कारभार सध्या प्रचंड गाजत आहे.
देशाचे जलशक्ती आणि आदिवासी व्यवहार राज्यमंत्री विश्वेश्वर तुडू यांनी आसाममध्ये अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तुडू यांच्यावर या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पण विश्वेश्वर तुडू यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
आसाममधील मयुरभंज जिल्ह्यातील बारीपाडा येथे ही घटना झाली आहे. जिल्हा नियोजन मंडळाचे उपसंचालक अश्विनी मलिक आणि सहाय्यक संचालक देबाशीष महापात्रा यांना सरकारी फाईली घेऊन भाजप कार्यालयात येण्यास सांगितले. पण आचारसंहिता लागू असल्यानं अधिकाऱ्यांनी फाईली आणल्या नाहीत, परिणामी मंत्री महोदयांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, सध्या हे प्रकरण प्रचंड गाजत आहे पण केंद्रीय मंत्री विश्वेश्वर तुडू यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्याविरोधात राजकारण केलं जात असल्याचं तुडू म्हणाले आहेत.
0 Comments