ग्लोबल डिसले गुरुजी वादाच्या भोवऱ्यात ; शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचे गंभीर आरोप


सोलापूर/प्रतिनिधी:

ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डीसले गुरुजी हे वादात सापडले आहेत. पीएचडीचे शिक्षण करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आहे. मात्र, त्यांनी त्यासाठी शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांकडे आले असता त्यांनी कुठे पीएचडी करणार?, विषय काय आहे?, असे अनेक प्रश्न विचारले. मात्र, डीसले गुरुजींकडे या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली नव्हती. अखेर त्यांनी डीसले गुरुजीच्या अर्जावर सही करण्यास नकार दिला.  तसेच डीसले गुरुजीची सर्व चौकशी करणार असल्याची माहिती दिली.

डीसले गुरुजी यांची नियुक्ती परितेवाडी येथे झाली होती. २०१७ साली त्यांची प्रतिनियुक्ती माळशिरस येथील वेळापूर येथे झाली होती. २०१७ ते २०२० असे प्रतिनियुक्तीचा कालावधी होता. मात्र, त्याकाळात ते वेळापूर येथील शाळेत हजर झाले नव्हते. डायटवर होते, असे उत्तर डीसले गुरुजींनी शिक्षण खात्याला दिले आहे. याचवर्षी त्यांची ग्लोबल टीचर अवॉर्ड साठी निवड झाली होती. क्यूआरकोड मधून त्यांनी नवीन शोध लावला होता. यावर देखील सखोल चौकशी करणार असल्याची माहिती शिक्षण अधिकारी डॉ. किरण लोहार यांनी सांगितले आहे.

आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यापासून गुरुजींत हेकोकोरपणा आला आहे, अशी शिक्षण विभागात चर्चा सुरू आहे. पीएचडीच्या मंजूरीसाठी फक्त एका साध्या कागदावर सही मागण्यांसाठी आली होती आणि सविस्तर माहिती देखील दिली नाही. शाळेत हजर नाही. हा हेकोकोरपणा दिसून येत आहे, अशी चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे.

Post a Comment

0 Comments