मौजे. राळेरास येथील जवळगाव मध्यम प्रकल्प फाटा क्र.५ च्या भूसंपादन मोबदला व सर्व्हिस रोड करण्याबाबत ची बैठक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली.
या प्रकल्पाच्या भुसंपादनाचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून एक महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सदर प्रस्ताव सादर करून सर्व्हिस रोड करण्याबाबतच्या सूचना खासदार राजेनिंबाळकर यांनी दिल्या. या भूसंपादन व सर्व्हिस रोडच्या अनुषंगाने दि. २० फेब्रुवारी, २०२२ रोजी पुढील बैठक आयोजित करण्याबाबत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना विनंती केली.
या बैठकीस माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपजिल्हाधिकारी लकारंडे , उपविभागीय अधिकारी शिंदे , तहसीलदार शेरखाने यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
0 Comments