तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने केला भारताचा पराभव



केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा एकदिवशीय सामना आज पार  पडला. अखेरच्या ओव्हरपर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताला ४ धावांनी पराभवाला सामोरे जावे  लागले. पहिले दोन सामन्यातच भारताने मालिका गमावली होती. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेने ३-० ने मालिका जिंकली आहे.

नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरु झाल्यानंतर उत्तम भारताने उत्तन गोलंदाजीचा नमूना दाखल मलान, बावुमा आणि मार्करम या खेळाडूंना तंबुत माघारी पाठवले. मात्र, डी कॉक आणि ड्युसेन यांनी डाव सारत २८८ धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले. डी कॉकने १२४ करत शतक तर, ड्युसेनने अर्धशतकी खेळी करत ५२ धावा केल्या. मिलरनेही ३९ धावांती पारी खेळली. भारतीय गोलंदजातील प्रसिध कृष्णाने सर्वाधिक ३, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन तसेच, युझवेंद्र चहलने एक विकेट घेतली.

२८८ धावांचे लक्ष गाठण्यासाठी शिखर धवन (६१), विराट कोहली (६५), दीपक चाहर (५४) यांनी अर्धशतक ठोकली. सूर्यकुमारने ३९/धावा केल्या. दीपक चाहरने हा १० धावांची गरज असताना झेलबाद झाला. त्यानंतर बुमराह, चहल आणि प्रसिद्ध यांना १० धावा करता न आल्याने भारतीय संघ २८२ धावांवर गुंडाळला गेला. त्यामुळे भारताला चार धावांनी पराभवला सामोरे जावे लागले.

Post a Comment

0 Comments