कौतुकास्पद! संस्कृती व रितेश यांचे संगीत स्पर्धेत यश...


सोलापूर;

अखिल भारतीय गांधर्व महामंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेचा निकाल जाहीर झाला, यामध्ये गायन स्पर्धेत जुळे सोलापूर येथील चंदन नगर येथील 'स्वरब्रह्म' संगीत विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. 

संगीत क्षेत्रात अत्यंत मानाची समजली जाणारी ही परीक्षा आहे. संस्कृती घुले ने प्रवेशिका प्रथम परीक्षेत विशेष योगदान मिळवत तर रितेश कोळी याने मध्यम प्रथम गायन स्पर्धेत प्रथम श्रेणी मिळवून हे यश संपादन केले आहे. रितेश कोळी हा भारती विद्यापीठात इयत्ता दहावी मध्ये शिकतो. रितेश व संस्कृती यांना 'स्वरब्रह्म' संगीत विद्यालयाचे संचालक संगीत विशारद सदाशिव चौरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments