बार्शी! अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी शहरातील अलीपूर रोड परिसरात दुकानात घुसून दोन अज्ञात इसमांनी गंठण लंपास केल्याचा प्रकार बार्शी शहरांमध्ये २१ जानेवारी रोजी दुपारी २ च्या दरम्यान घडला आहे. जयश्री राजेंद्र मोरे (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा दुपारच्या वेळी मैत्रिणीच्या दुकानात गप्पा मारत उभ्या होत्या. त्यावेळी हेल्मेट घातलेला एक युवक दुकानांमध्ये सॉक्सची चौकशी करत होता, हे नको दुसरे सॉक्स दाखवअसे म्हणत त्यांनी महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले. ६० हजार रुपये किमतीचे गंठण घेऊन दोघेजण बार्शी शहराच्या दिशेने पसार झाले. त्यावेळी फिर्यादीने व त्यांच्या मैत्रिणीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला परंतु दुपारच्या वेळी रस्त्यावर कोणी नसल्याने ते पळून गेले. पोलिसांनी त्यांना पकडून जर समोर उभे केले तर मी ओळखू शकते असेही फिर्यादीत नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments