चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत असलेले बॉलीवूडचे जोडपे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहेत. मालदीवमध्ये त्यांच्या रोमँटिक सुट्टीनंतर अर्जुन, मलायका यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत आहेत.
मलायका आणि अर्जुनचे नाते नेहमीच चर्चेत असते. चार वर्षांच्या नात्यात, या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. रिपोर्ट्सनुसार, मलायका जरा लांबच राहत आहे. आणि ती गेल्या सहा दिवसांपासून ती घरातून बाहेर पडली नाही. दुसरीकडे, अर्जुन कोविडशी झुंज देत आहे आणि बहीण अंशुला कपूर यांच्यासोबत घरी एकांतात आहे. मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
0 Comments