अक्कलकोट! शेतात रस्ता देण्यासाठी मागितली 25 हजाराची मागितली लाच, तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात


अक्कलकोट : शेतातील रस्ता वहिवाटीसाठी खुला करून देण्यासाठी अर्जावर सुनावणी होऊन निकाल तुमच्या बाजूने लावून देतो म्हणून वीस हजाराची लाच मागितली त्यामुळे तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली.

समाधान बाळासाहेब काळे, वय ३३,व्यवसाय नोकरी, पद तलाठी सज्जा खानापूर, तहसिल अक्कलकोट, रा समर्थ नगर,ता. अक्कलकोट जि. सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी त्यांच्या मौजे अंकलगे येथील शेतजमिनी मधुन जाणे येण्याकरीता तसेच शेतमालाची ने आण करण्याकरीता वहीवाटीसाठी रस्ता खुला करुन मिळणेबाबत तहसिलदार कोर्ट, अक्कलकोट येथे सादर केलेल्या अर्जावर • सुनावणी होवुन तक्रारदार यांच्याबाजुने निकाल लावुन सदर निकालाची प्रत देण्याकरीता  समाधान काळे यांनी २५,००० रुपयांची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता २० हजार रुपयांची मागणी केली, हे सिद्ध झाल्याने  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठी काळे यांना बुधवारी ताब्यात घेतले। त्यांच्या विरोधात अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई संजीव पाटील, पोलीस उप अधिक्षक अॅन्टीकरप्शन ब्युरो सोलापुर, उमाकांत महाडिक पोलीसनिरीक्षक, तसेच श्री सोनवणे,श्रीराम घुगे, उमेश पवार, स्वप्नील सणके  यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments