अवकाळी पावसामुळे द्राक्षबागेचे नुकसान झाले एन डी आर एफ किंवा एस डि आर एफ मधून तात्काळ द्राक्षबागेसाठी एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी भैरवनाथ शेतकरी व शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे यानी जिल्हाधिकारी यांचे कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .
सोलापूर जिल्हयात दिनांक 26/11/ 2021 ते 2/12/2021 पर्यन्त अवकाळी पावसामुळे द्राक्षबागेचे नुकसान झाले आहे सदरचा पाऊस हा बिगर मोसमी असल्याने या पावसाचा द्राक्षबागेवर वाईट परिणाम होत असून, झाडावरील लागलेले फळ सर्व गळून गेले आहेत, द्राक्ष बागेचे नुकसान हे 80% पेक्षा जास्त झाले असून ,जिल्हा अधिकारी यांचे कडे एन डी आर एफ किंवा एस डि आर एफ मधून द्राक्षे बागेसाठी एकरी एक लाख रुपये मदत मिळालीच पाहीजे अशी मागणी सूर्यकांत चिकणे, प्रवीण डोके रेख चिकणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे .
0 Comments