भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे. ज्या वेळी प्रसंग येईल त्यावेळी आपण तिथं कधी बसू असं त्यांना झालंय अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोमणा मारला. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुण्यात भाजप पक्षकार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे आणि त्यासाठी आम्ही दिवसाही स्वप्न पाहतो असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
याबाबत पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, पुन्हा मुख्यमंत्री होण्याची देवेंद्र फडणवीस यांना काही घाई नाही. चंद्रकांत पाटलांना घाई आहे. ज्या वेळी प्रसंग येईल आणि आपण तिथ कधी बसू असं कदाचित त्यांना झालंय. त्यामुळे फडणसविसांना माहित आहे. त्यांच्या पक्षात त्यांचे कोण हितचिंतक आहेत आणि त्यांना हे सुध्दा माहित आहे की चंद्रकांत दादा त्या यादीत नाहीत, असा टोलाही यावेळी जयंत पाटील यांनी लगावला.
0 Comments