बार्शी! खडकोणीमध्ये विनापरवाना दारू विक्रेत्याकडून ४२० रुपयाची दारू जप्त; तालुका पोलिसाची कामगिरी


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील खडकोणी गावामध्ये १ डिसेंबर रोजी ६.१५ वाजता विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या एकावर तालुका पोलिसांनी कारवाई केली, असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी तालुका पोलीस आगळगाव हद्दीत पेट्रोलिंग करत असताना खडकोणी गावामध्ये विनापरवाना बेकायदेशीर दारु विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एसटी स्टँड च्या पाठीमागे अडचणीच्या ठिकाणी एक इसम पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये सात ढोकी संत्रा नावाच्या शिलबंद काचेचा चपट्या बाटल्या आढळून आल्या. त्याची एकूण किंमत ४२० रुपये आहे. ती दारू पोलिसांनी जप्त करून वसुदेव काशीनाथ नलवडे रा. खडकोणी ता. बार्शी यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल रामदास साठे, पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल बोबडे, व पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments