बार्शीत नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलाच्या लीलावातून सव्वा कोटींची जमा



 येथील भगवंत मैदान स्टेडियम गॅलरी खालील ए विंगच्या २१ गाळ्यांच्या जाहिर लिलावाचा कार्यक्रम भगवंत मैदान येथे इच्छुकांच्या उपस्थितीत पार पडला. मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व उपस्थितीत या लिलाव प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. या लिलाव प्रक्रियेतून नगरपरिषदेला १ कोटी २३ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. 
 
पूर्वीच्या भगवंत मैदान गाळ्यांचे बांधकाम व्यापाऱ्यांसाठी खूप गैरसोयीचे होते, नव्याने बांधकाम झाल्यानंतर त्यात सुसुत्रता आल्याने भगवंत मंदिराजवळ असलेल्या या गाळ्यांना अनेकांची मागणी होती. तसेच पूर्वीपासून त्या ठिकाणी व्यवसाय केलेल्या व्यापाऱ्यांनाही तेच गाळे मिळावे अशी अपेक्षा होती. 
 
सार्वजनिक कार्यक्रमातून आयोजित केलेल्या जाहिर लिलावात एका गाळ्यासाठी ४ लाख ८० हजारांपासून १५ लाख ३० हजारांपर्यंतची बोली लावण्यात आली. आरक्षणाच्या गाळ्यासाठी नेहा साळुंखे या लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. कार्यक्रमासाठी मोठा पोलिस बंदोबस्त, प्रशस्त बैठक व्यवस्था, चित्रीकरणासह साेशल मिडीयाद्वारे थेट प्रक्षेपण इत्यादींची सोय करण्यात आली होती. विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनीही या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. 
 
यावेळी मिळकत विभागप्रमुख महादेव बोकेफोडे, बांधकाम विभागप्रमुख भारत विधाते, प्रशासकिय अधिकारी शिवाजी कांबळे, भांडारपाल भगवंत बोकेफोडे, दत्तात्रय चव्हाण, आनंद कांबळे, अंकुश कांबळे, शेखर मरोडा, रोहन कांबळे, अजय कांबळे, तुषार खडके, अभिमान आगलावे, तुषार सकट, बापू बनसोडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments