बार्शी तालुक्यातील तडवळे गावांमधील अवैधरित्या वाळू तस्करी केली जात असल्याची माहिती वैराग पोलिसांना मिळाले, त्यानुसार एक डिसेंबर रोजी रात्री एक वाजता वाळू तस्कर आला पोलिसांची चाहूल लागताच त्याने वाहन जागेवर सोडून पळ काढला, त्या ठिकाणाहून पोलिसांनी पाच लाख तीन हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बार्शी तालुक्यातील भोगावती नदीकाठावर तडवळे गावांमध्ये शासनाचा कसल्याही प्रकारचा पास परवाना न घेता अगर रयल्टी न भरता, पर्यावरणाचा-हास होत आहे हे माहीत असुन सुध्दा भोगावती नदीपात्रातून चोरून वाऴू उपसा करून स्वतःचे फायदेसाठी चोरून वाऴु भरुन घेवून जात असतांना मिळून आले, पोलिसांची चाहूल लागताच वाहनातील ड्रायव्हरने मध्य रात्री अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. पोलिसांनी पंचांसमक्ष 5,00,000/- रु. कि. चा एक लाल रंगाचा बिगर नंबरचा अर्जून कंपनीचा ट्रक्टर असा असलेला त्याचा पाठीमागे बीगर नंबरची लाल रंगाची दोनचाकी डंपींग ट्रली 2) 3,000/- आर्धा ब्रास वाऴु कि अंएकुण 5,03,000/- रु येणेप्रमाणे यात नमूद वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल (वाहन) पंचासमक्ष ताब्यात घेवून पोलीस ठाणेस आणून लावले आहे. भा.द.वि. कलम 379, पर्यावरण संरक्षण अधिनियम 9 व 15 प्रमाणे अज्ञानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास वैराग पोलिस करत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक विनय अहिर यांनी दिली.
0 Comments