करमाळा! वृद्ध कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न माजी सरपंच औदुंबराचे भोसले पाटील यांच्यामुळे मार्गी


करमाळा:

करमाळा तालुक्यातील २३ वृध्द कलाकारांना मानधन मंजुरी मिळून त्याचे मानधन संबंधितांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. हे प्रस्ताव नेरले, निमगाव हवेली, कामोने, रामवाडी येथील वृध्द कलाकार यांनी नेरलेचे माजी सरपंच औदुंबरराजे भोसले पाटील यांच्या पुढाकाराने दाखल केलेले होते. त्यानंतर, दरम्यानच्या काळात सदरील सर्वच प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व सिना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश (बापू)नीळ पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते व त्यांच्या प्रयत्नास यश आले आहे.
 
करमाळा तालुक्यातील सर्वच वृध्द कलाकार यांच्या वतीने जिल्हा वृध्द कलाकार मानधन समितीचे शासन नियुक्त अध्यक्ष मारुती जाधव व सतीश बापू नीळ यांचे या दोघांचा सद्गुरू समर्थ श्री.शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर यांच्या हस्ते निमगाव हवेली येथे सन्मान करणार असल्याचे मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments