बार्शी/प्रतिनिधी:
लग्नात मानपान व्यवस्थित केलं आहे हॉस्पिटल बांधण्यासाठी माहेरुन पैसे आण म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी हर्षदा अक्षयकुमार अडाले (वय३१) रा. भुतवाडा रोड, जामखेड याप्रकरणी पती व सासऱ्याच्या विरोधात बार्शी शहर गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात आमचे मानाप्रमाणे मानपान मिऴाला नाही, तसेच स्वतचे क्लिनिक टाकणेसाठि व नविन घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहुन पैसे आण असे म्हणुन टोमणे मारुन, अपमान करुन मारहाण करुन सासरे यांनी बंदुकीचा धाक दाखवुन तुला खल्लास करीन अशी धमकी दिली व पती याने माझी इच्छा नसताना माझेसोबत जबरदस्तीने संबंध ठेवले आहेत. असे फिर्यादीत नमूद केले आहे त्यानुसार अक्षयकुमार अरुण अडाले ( पती) व अरुण निवृत्ती अडाले (सासरा) दोघे रा भुतवाडा रोड, जामखेड या दोघांविरोधात बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments