कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन


कोल्हापूर उत्तरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावरती उपचार सुरु असतानाच हैदराबाद येथे निधन झालं आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना हैदराबादमधील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं, त्यांच्यावरती उपचार सुरु होते मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

चंद्रकांत जाधव हे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. 2019 ला जाधव हे पहिल्यांदाच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. दरम्यान आज दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव हैदराबादमधून कोल्हापुरात आणण्यात येणार असल्य़ाचे समजत आहे.

जाधव यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यातूनही ते बरे झाले होते. मात्र त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचार सुरू असताना वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments