जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका नवविवाहित महिलेकडे तिच्या दिराने शरीरसुखाची मागणी करत तिच्याशी अश्लील वर्तन केलं आहे.
एवढंच नव्हे तर सासऱ्याने देखील महिलेला वाईट हेतूने स्पर्श केला आहे. या प्रकरणी दीर आणि सासऱ्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पीडित महिलेचं ऑगस्ट महिन्यात लग्न झालं असून ती जळगाव शहरातील रामानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या पतीसोबत राहते. तर तिचे सासरे आणि दीर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरीकडे राहतात. गेल्या तीन दिवसांपासून पीडित महिलेचा पती घरी आला नव्हता.
पतीशी कोणताही संपर्क होत नसल्याने पीडित महिला आपल्या पतीबाबत विचारपूस करण्यासाठी सासरी गेली होती. शनिवारी सायंकाळी पीडित महिला आपल्या सासरी गेली असता, आरोपी दिराने तिच्याशी अश्लील वर्तन केलं आहे. तुझा पती मरून गेला असं म्हणत आरोपी दीर पीडितेला बेडरुममध्ये घेऊन गेला.
याठिकाणी आरोपीनं आपल्या वहिनीकडे शरीरसुखाची मागणी करत तिच्याशी अश्लील वर्तन केलं. एवढंच नव्हे तर सासऱ्याने देखील पीडित महिलेला वाईट हेतूने स्पर्श केला. घाबरलेल्या महिलेनं कशीबशी आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतली. धक्कादायक घटनेनंतर दुसऱ्या दिवशी रविवारी पीडित महिलेनं शहर पोलीस ठाण्यात जाऊन झालेल्या प्रकाराबद्दल फिर्याद दाखल केली.
जळगाव शहर पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमाअंतर्गत दीर आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिराने पीडित महिलेच्या पतीबाबत अपशब्द वापरल्याचं देखील तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.
0 Comments