परांडा! नेहरू युवा केंद्राच्या वतीने कोरूना जनजागृती कार्यक्रम


परंडा/प्रतिनिधी:

नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद व ग्लोबल विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १० डिसेंबर २०२० रोजी ग्लोबल विद्यालय पिंपरखेड ता. परंडा येथे कोरोना संदर्भात जनजागृती तसेच जल शक्ति अभियान राबविण्यात आले. 

या वेळी विविध गावातील विध्यार्थीना कोरोना संदर्भात जनजागृती करून व पोस्टर द्वारे माहिती देउन जागरूक राहण्याचे आश्वासन दिले. तसेच 'कॅच द रेन अंतर्गत पोस्ट र द्वारे जल शक्ति अभियान' राबविण्यात आले. या वेळी येथील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, इतर शिक्षक- शिक्षिका तसेच परंडा तालुका समन्वयक सचिन मुके व शिरसाव ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर चोबे हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments