माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजयेपी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपने निधी उभा करण्यासाठी ‘माइक्रो डोनेशन अभियान’ सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भारतीय जनता पक्षाला 1 हजार रुपये देणगी दिली असल्याची माहिती दिली आहे.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.रुपाली ट्विटमध्ये म्हणाल्या की, भाजपाला एक हजार रुपये देणगी दिल्याने, देश कसा मजबूत होईल ? यावर एक तज्ञ समिती नेमायला हवी का? यह पब्लिक है, सब जानती है. ज्याच्या पक्षाची अर्थव्यवस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यवस्था कशी मजबूत करतील? असा सवाल रुपाली पाटील यांनी उपस्थित केला आहे.
0 Comments