बार्शी/प्रतिनिधी:
दिनांक 12.12.2021 रोजी बार्शी येथील सावळे आण्णा सभागृह या ठिकाणी सकाळी ठीक अकरा वाजता, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार संतोष सूर्यवंशी व ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तसेच संघटनेचे जिल्हा सहसचिव विनोद ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर संघटनेचे सल्लागार मयुर गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची महत्वपूर्ण आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष, ज्येष्ठ संपादक, मा. राजा माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, डिजिटल मीडिया मधील कार्य करणाऱ्या सर्व संपादक व पत्रकार यांच्या न्याय व हक्कासाठी जिवंत आणि ज्वलंत चळवळीमध्ये रूपांतर झालेल्या महाराष्ट्र राज्यातील एकमेव संघटनेच्या कार्याचा वाढता आलेख दिवसेंदिवस उंचावत चाललेला आहे. याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या बार्शी तालुका कार्यकारिणीची आढावा बैठक आज संपन्न झाली.
या बैठकीमध्ये पत्रकार संतोष सूर्यवंशी, पत्रकार विनोद ननवरे, पत्रकार मयूर गलांडे यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. सदरील बैठकीमध्ये संघटनेच्या कार्यवाढीसाठी व विविध विषयावर चर्चा झाली व बैठकीमधील ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत व प्रस्तावना सहसचिव धीरज शेळके यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार तालुकाध्यक्ष अजय पाटील यांनी मानले.
या बैठकीसाठी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब पवार, जिल्हा सचिव विनोद ननवरे, सल्लागार मयूर गलांडे, तालुकाध्यक्ष अजय पाटील, उपाध्यक्ष इरशाद शेख, खजिनदार अमीन गोरे, सहसचिव धीरज शेळके, ऍड संतोष कुलकर्णी, श्रीशैल माळी, ओंकार हिंगमिरे, साबीर शेख, विकी गोंदकर, सौ वैशाली ढगे आदी उपस्थित होते.
0 Comments