बार्शी! अवैधरित्या देशी-विदेशी दारू जवळ बाळगल्या बद्दल; फपाळवाडी मधील एकावर शहर पोलिसात गुन्हा दाखल



बार्शी:

बार्शी शहर पोलीस पेट्रोलिंग करत असताना बस स्टॅन्ड चौकामध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस वाहनाची चेकिंग करत असताना फपाळवाडी मधील एक इसम विनापरवाना मोटरसायकल चालवताना आढळून आला, त्याला पोलिसांनी अडवून त्याच्या पिशवीमध्ये तपासणी केली असता देशी विदेशी दारू च्या बाटल्या आढळून आल्या त्यानुसार शहर पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी स्टँड चौकामध्ये पोलिसांनी आश्रम विठल करंडे (वय 28) रा फपाळवाडी ता बार्शी ह्याला विनापरवाना वाहन चालवतो म्हणून ताब्यात घेतले असता त्याच्याकडे बेकायदेशीर विनापरवाना दारू आढळली. पोलिसांनी त्याच्याकडून 960 /-  रु किंमतीचे  ऑफीसर चईस कंपनीचे 180 मिलीचे एकुण 8 शिलबंद विदेशी दारुचे बाटल्या प्रत्येकी 120/- रु 2 ) 900/-  रु किंमतीचे टगेा पंच कंपनीचे 180 मिलीचे एकुण 15 शिलबंद देशी  दारुचे बाटल्या 3)   25000/- रु  किंमतीची एक हिरो सीडी डिलक्स् कंपनीची लाल रंगाची मोटार सायकल नंबर MH13-CF-0181 ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे व मोटार वाहन कायदा कलम 3(1)/181 प्रमाणे बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments