वैराग! चार लाख रुपये माहेरून आण म्हणून विवाहितेचा छळ ; पतीसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल


वैराग/प्रतिनिधी:

चार लाख रुपये माहेरून आण म्हणून छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू व नणंद यांच्यावर वैराग पोलिसात ऋतुजा युवराज माने (वय 20), रा. जयमल्हार कलनी वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे सध्या रा- उपळे (दु) ता. बार्शी 
यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त असे, फिर्यादी ह्या गेल्या तीन महिण्यापासुन माहेरी उपळे दु ता. बार्शी येथे राहणेस आहे. त्यांचे लग्न दि.03/01/2021 रोजी मौजे उपळे दु. ता बार्शी येथील रामेश्वर मंदीरामध्ये हिंदु रितीरिवाजाप्रमाणे युवराज भगवान माने रा. जयमल्हार कलनी वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे याचे सोबत आई वडीलांनी खर्च व मानपान करुन केले आहे. त्यानंतर पती जयमल्हार कलनी वाल्हेकरवाडी पिंपरी चिंचवड पुणे येथे राहणेस असलेने त्यांचेकडे नांदण्यासाठी गेले त्यानंतर  पती व नातेवाईकाने मला दोन महीने व्यवस्थित नांदविले, त्यानंतर मार्च 2021 पासुन पती यांनी मला घर घेण्यासाठी माहेरवरुन चार लाख रुपये घेवुन ये असे म्हणुन मारहाण करुन शिवीगाळी दमदाटी करु लागले. त्या बाबत मी आई वडील यांना फोनद्वारे सांगितले, त्यानंतर आई वडील म्हणाले की आमच्याकडे देणेकरीता चार लाख रुपये नाहीत असे सांगितले.  पती युवराज यांना सांगितले की माझे आई वडीलांकडे चार लाख रुपये देणेकरिता नाहीत असे सांगितले नंतर ही पती युवराज भगवान माने, सासु फुलाबाई भगवान माने व नणंद पुजा राजाभाऊ जाधव हे वारंवार  घर घेण्यासाठी माहेरवरुन चार लाख रुपये घेवुन ये असे म्हणुन मला मारहाण करुन शिवीगाळी दमदाटी करुन उपाशीपोटी ठेवुन घराचे बाहेर हाकलुन देवु लागले परंतु त्यांचे सोबत नांदायचे असलेने सहन करत होती. माहेरी उपळे दु. ता. बार्शी येथे आल्यानंतर झाला सर्व प्रकार आई वडीलांना सांगत होते, त्यावेळी आई वडील सांगायचे की आम्ही मजुरी करुन खातो आमचेकडे देणेसाठी पैसे नाहीत असे सांगत असे नांदण्यास गेल्यानंतर मी माझे सासरचे लोकांना सांगत असे की माझे माहेरची परिस्थिती हलाखीची आहे असे सांगुन देखील पती युवराज भगवान माने, सासु फुलाबाई भगवान माने व नणंद पुजा राजाभाऊ जाधव हे वारंवार मला घर घेण्यासाठी माहेरवरुन चार लाख रुपये घेवुन ये असे म्हणुन शारिरीक मानसिक त्रास देवुन मारहाण करुन शिवीगाळी दमदाटी करुन उपाशीपोटी ठेवत होते. त्यानंतर दि.29/09/2021 रोजी मला माहेर वरुन पैसे घेवुन ये म्हणुन  पती युवराज भगवान माने, सासु फुलाबाई भगवान माने व नणंद पुजा राजाभाऊ जाधव यांनी  हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळी दमदाटी केल्यानंतर फिर्यादीचे वडील विठ्ठल यांना पिंपरी चिंचवड पुणे येथे बोलावुन घेवुन त्यांचे सोबत माहेरी उपळे दु येथे आले त्यानंतर मी माझे सासरचे लोकांनविरुध्द पिंपरी चिंचवड येथील महीला तक्रार निवारण कक्ष यांचेकडे तक्रार केली होती.

 तरी लग्न झालेचे नंतर मार्च 2021 रोजी पासुन ते दि.29/09/2021 रोजी पर्यंत सासरी मौजे जयमल्हार कलनी वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे येथे वारंवार 1) पती युवराज भगवान माने, 2) सासु सौ फुलाबाई भगवान माने रा.जयमल्हार कलनी वाल्हेकरवाडी चिंचवड व 3) नणंद पुजा राजाभाऊ जाधव रा चाफेकर चौक केशवनगर चिंचवड पुणे यांनी मला घर घेण्यासाठी माहेरवरुन चार लाख रुपये घेवुन ये असे म्हणुन मला शारिरीक मानसिक त्रास देवुन हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळी दमदाटी करुन उपाशीपोटी ठेवले म्हणुन त्यामुळे त्यांच्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments