महाराष्ट्रात कधी लागू होणार लॉकडाऊन? आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती



महाराष्ट्रात लॉकडाऊन कधी लागू होणार आहे याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे  यांनी शनिवारी माहिती दिली. वैद्यकीय ऑक्सिजनची दररोजची मागणी 800 मेट्रिक टनपर्यंत असेल तेव्हाच राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाईल असे टोपे म्हणाले. टोपे यांनी जालन्यात पत्रकारांना सांगितले की, ओमायक्रॉनची प्रकरणे "झपाट्याने" वाढत आहेत, मात्र सर्वसाधारणपणे अशा रुग्णांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्याची गरज नाही किंवा त्यांना पूरक ऑक्सिजनची गरज नाही. ते म्हणाले, 'वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी जेव्हा 800 मेट्रिक टन (दररोज) वाढेल तेव्हाच राज्यव्यापी लॉकडाऊन होईल'.

राजेश टोपेंनी राज्यातील वैद्यकीय ऑक्सिजनच्या वापराच्या सध्याच्या दराचा उल्लेख केला नाही. ते म्हणाले, लोकांना अधिक निर्बंधांचा सामना करावा लागू नये अशी आमची इच्छा आहे, म्हणून मी लोकांना आवाहन करत आहे की त्यांनी कोविड-योग्य वर्तनाचे पालन करावे. मास्क घालणे खूप महत्वाचे आहे.

Post a Comment

0 Comments