बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील सहारा वृद्धाश्रमचे अध्यक्ष राहुल भड यांना मराठवाडा लोकविकास मंचच्या वतीने देण्यात येणारा वृद्ध सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राहुल भड हे मागील १७ वर्षापासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय असून यापूर्वी त्यांना परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार, गुणिजन रत्नगौरव पुरस्कार, राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार, प्रतिभा संग्राम पंढरी गौरव पुरस्कार, ग्राहक समितीच्या वतीने आदर्श पुरस्कार, स्व. जयवंत (दादा) काटमोरे प्रतिष्ठान यांच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार, जिविका फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार अशा विविध सामाजिक संस्था, संघटना यांनी त्यांना सन्मानित केले आहे.
राहुल भड यांनी सहारा वृद्धाश्रमच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन कळंब येथे मराठवाडा लोकविकास मंचच्या वतीने अफार्म संस्थेचे माजी अध्यक्ष एम. एन. कोंढाळकर, संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ तोडकर, उपाध्यक्ष भूमीपत्र वाघ, मंगला दैठणकर, रमाकांत कुलकर्णी, प्रमोद झिंजाडे, दत्ताभाऊ बारगजे, कालिंदीताई पाटील, रमेश भिसे यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन भड यांना सन्मानित करण्यात आले.
0 Comments