सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याच्या मुंबई, दिल्ली आणि लखनऊमधील कार्यालयांसह ६ ठिकाणांची प्राप्तिकर खात्याच्या अधिकारयांनी बुधवारी तपासणी केली. दिल्ली सरकारने सोनू सूदला मेंटरशीप प्रोग्रॅमचा ब्रँड ॲम्बेसिडर बनविल्यानंतर जाणूनबुजुन ही कारवाई झाली असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
यासंदर्भात सोनू सूदने, 'लोकांसाठी काम करत आलोय आणि करत राहणार' असं ट्विट केलेलं आहे. कोरोनाकाळात अभिनेता सोनू सूदने अनेक गरिबांना केलेल्या आर्थिक मदतीमुळे तो गरिबांचा मसिहा म्हणून ओळखला जात होता. प्राप्तिकर खात्याच्या या कारवाईवर सोनू सूदचे फॅन्स प्रचंड भडकलेले दिसत आहेत.
0 Comments