बार्शी! गौडगावमध्ये वाघ्या मुरळीचा कार्यक्रम पाहत असताना अंगावर पडला विचारले म्हणून एका जणाला बेदम मारहाण


वैराग/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे वाघ्या मुरळीचा कार्यक्रम रात्री साडेबाराच्या दरम्यान 6 डिसेंबरला चालू होता. माझ्या अंगावर का पडला असे विचारले असता एका जणाला पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडोबा मंदीराजवळ फिर्यादीचा हनुमंत भारत बदे याने गणेश प्रकाश भ़ड याला अंगावर का पडला असे विचारलेचे कारणावरुन 1) गणेश प्रकाश भड, 2) विशाल किसन भड, 3) सचिन किसन भड, 4) प्रकाश त्रिंबक भड, 5) अजय प्रकाश भड सर्व रा.गौडगाव ता.बार्शी यांनी संगणमत करुन पकडुन शिवीगाळ करुन हाताने, लाथाबुक्कयांनी मारहाण करुन भिंतीवर ढकलुन दिले तसेच गणेश प्रकाश भड याने  शिवीगाळ करुन लोखंडी गज माझे डोक्यात मारुन जखमी केले व तु गावात कसा राहतो अशी धमकी देवुन सर्वजन निघुन गेले. याप्रकरणी वैराग पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी माहिती वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments