भाजपच्या नेत्यांनंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकार कधी कोसळणार याचं भाकीत केलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर मार्चमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असं भाकीत रामदास आठवले यांनी केलं आहे. ते लोणावळा येथे बोलत होते.
महाविकास आघाडी सरकार फार काळ टीकणार नाही. त्यामुळे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला भाजप-शिवसेनेनं अवलंबवावा, असं आवाहन केलं. तसंच, पुढे बोलताना त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुका संपल्या की चित्र बदलेल. मार्चच्या आसपास महाविकासआघाडी सरकार पडेल आणि भाजप सत्तेत येईल, असं दावा रामदास आठवले यांनी केला.
0 Comments