महाविकास आघाडी मध्ये बिघाडी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पोस्टवरुन शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यावर धावून गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंवर खळबळजनक आरोप केले आहेत.
एकनाथ खडसे आणि रोहणी खडसेंकडून माझ्या जीवाला धोका आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चां रंगल्या आहेत.राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी मतदारसंघातील महिला सुरक्षित नसल्याचे टि्वट केले आहे. त्यांनी वेळेप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटलांना चोप देण्याची भाषा केली. तर आमदार पाटील यांनी खडसे पिता- पुत्रीकडून आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
0 Comments